अ‍ॅपशहर

करेक्ट कार्यक्रम! दुचाकीचोर सुसाट सुटले; पण वॉचमन फास्टर फेणे निघाला; चोरी फसली, पाहा VIDEO

पालिका अधिकारी असल्याची बतावणी करत दोघांनी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. डिलिव्हरी एजंटची बाईक पळवण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकानं हाणून पाडला. दिल्लीतील कालकाजी एक्स्टेंशन वसाहतीत ही घटना घडली.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2022, 9:40 am
नवी दिल्ली: पालिका अधिकारी असल्याची बतावणी करत दोघांनी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. डिलिव्हरी एजंटची बाईक पळवण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकानं हाणून पाडला. दिल्लीतील कालकाजी एक्स्टेंशन वसाहतीत ही घटना घडली. सुरक्षा रक्षकानं अगदी वेगात हालचाली केल्या. त्यानं वसाहतीचा गेट बंद करून घेतला. त्यामुळे दुचाकी दोन गेटच्या मध्ये अडकली आणि चोरी फसली. सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे दोन्ही चोरटे पकडले गेले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi thief


सुरक्षा रक्षकानं केलेल्या वेगवान हालचालींमुळे चोरीचा प्रयत्न फसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. इमारतीच्या निरीक्षणासाठी आल्याचं सांगून दोघे वसाहतीत शिरले. दुपारी दोनच्या सुमारास एक कुरियर डिलिव्हरी एजंट वसाहतीत आला. एजंट दुचाकीची चावी काढायला विसरला. हीच संधी चोरट्यांनी साधली. त्यांनी दुचाकी सुरू केली आणि वेगात दामटवली.

आपली दुचाकी घेऊन दोन जण पळून जात असल्याचं पाहून डिलिव्हरी एजंट जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज सुरक्षा रक्षकानं ऐकला. गेट बंद करा असं एजंट जोरजोरात ओरडत होता. त्यानंतर सुरक्षा रक्षकानं वायूवेगानं हालचाली केल्या. सुरक्षा रक्षक गेट बंद करत असल्याचं पाहून चोरट्यांनी बाईकचा वेग वाढवला. गेट बंद होण्याआधी बाहेर पडायचा असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांच्या वेगापेक्षा सुरक्षा रक्षकाचा वेग जास्त होता. दुचाकी गेटबाहेर जाणार इतक्यात दोन्ही गेट बंद झाले. सुरक्षा रक्षकानं अचूक टायमिंग साधलं.
पोटदुखीचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी पोटातून काढले तब्बल ६३ चमचे
चोरटे पळवून नेत असलेली दुचाकी दोन्ही गेटच्या मधोमध अडकली. पूर्ण वेगात पळणारी दुचाकी अचानक थांबल्यानं दोन्ही चोरटे गडबडले. त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र गेटबाहेर असलेल्या लोकांनी एकाला पकडलं. दुसरा पळून गेला. तो शेजारच्या सोसायटीत शिरला. तिथल्या पार्कमध्ये लपून बसला. मात्र तिथल्या लोकांनी त्याला पकडलं. यानंतर स्थानिकांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन लावून दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख