अ‍ॅपशहर

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी पूनम महाजन

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आणि मुंबईतील खासदार पूनम महाजन यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडे युवा मोर्चाचे अध्यक्षपद होते. त्यांच्या जागी पूनम यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Maharashtra Times 15 Dec 2016, 10:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp appoints party mp poonam mahajan as youth wing chief replacing anuragthakur
भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी पूनम महाजन

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आणि मुंबईतील खासदार पूनम महाजन यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडे युवा मोर्चाचे अध्यक्षपद होते. त्यांच्या जागी पूनम यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय तत्काळ लागू करण्याचे निर्देशही पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आले आहेत.

BJP National President, Shri @AmitShah appoints BJP National morcha presidents as follows - https://t.co/np4v4EZ0FL pic.twitter.com/y7ohbLt42h — BJP (@BJP4India) December 15, 2016
युवा मोर्चासह भाजपच्या अन्य राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्षही बदलण्यात आले आहेत. त्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे...

अनुसूचित जाती मोर्चा - विनोद सोनकर, खासदार

अनुसूचित जनजाती मोर्चा - रामविचार नेताम, खासदार

किसान मोर्चा - वीरेंद्र सिंह मस्त, खासदार

ओबीसी मोर्चा - दारा सिंह चौहान, माजी खासदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज