अ‍ॅपशहर

राम मंदिरापासून भाजप पळू शकत नाही!: स्वामी

'राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या २०१४च्या जाहीरनाम्याचा भाग आहे. भाजप त्यापासून पळू शकत नाही. ते आश्वासन आम्हाला पाळावंच लागेल,' असं खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 19 Oct 2016, 12:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp cannot run away from ram mandir issue
राम मंदिरापासून भाजप पळू शकत नाही!: स्वामी

'राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या २०१४च्या जाहीरनाम्याचा भाग आहे. भाजप त्यापासून पळू शकत नाही. ते आश्वासन आम्हाला पाळावंच लागेल,' असं खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

अयोध्येत रामायण संग्रहालय बनविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयावर भाजपचे खासदार विनय कटियार यांनी मंगळवारी तीव्र नाराजी दर्शवली होती. 'रामायण संग्रहालय हा लॉलीपॉप आहे. या लॉलीपॉपनं काही होणार नाही. त्याऐवजी सरकारनं मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,' असं कटियार यांनी म्हटलं होतं. स्वामींनीही त्यांच्याच सुरात सूर मिसळला आहे. 'राम मंदिर जबरदस्तीनं बनवायला हवं असं आमचं म्हणणं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ते करता येईल. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेऊन विषय संपवून टाकायला हवा,' असं स्वामी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज