अ‍ॅपशहर

LAC: शहीद तिबेटी जवानाच्या अंत्यसंस्कारात राम माधव सहभागी, काय दिला चीनला इशारा?

पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत-चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात १५ जूनला हिंसक संघर्ष झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर २९-३० ऑगस्टला पुन्हा एकदा संघर्ष झाला. यात भारतीय लष्कराच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सचा कमांडो शहीद झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2020, 5:03 pm
लेहः पँगाँगमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात भारतासाठी तिबेटचा नीमा तेन्झिन हा जवान शहीद झाला. त्याच्या अंत्यसंस्कारात भाजप नेते माधव सहभागी झाले. संपूर्ण सन्मानात नीमा तेन्झिन यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर भारत आणि स्वतंत्र तिबेटचा झेंडा होता. शहीद जवान नीमा तेन्झिन यांच्या अंत्यसंस्कारात भाजप नेते राम माधव यांनी सहभागी होत चीनल कडक संदेश दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp leader ram madhav pays tribute to sff commando nyima tenzin strong message for china
LAC: शहीद तिबेटी जवानाच्या अंत्यसंस्कारात राम माधव सहभागी, काय दिला चीनला इशारा?


सीमेवर दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. अशा स्थितीत भाजप नेते राम माधव यांनी चीनला कडक शब्दात इशारा दिला आहे. शहीद तिबेटियन कमांडोवर भारताला अभिमान आहे. राम माधव यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अंत्यसंस्काराची फोटोही ट्विट केली होती. पण नंतर ती हटवण्यात आली.

'भारत माता की जय' च्या घोषणा

नीमा तेन्झिनच्या अंत्यसंस्कारावेळी तिबेट आणि भारताचे झेंडे दिसले. तसेच 'भारत माता की जय' आणि तिबेटच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. स्पेशल फ्रंटियर फोर्स (एसएफएफ) झिंदाबाद, सॅल्यूट इंडियन आर्मी, विकास रेजिमेंट की जय, अशा घोषणा दिल्या गेल्या. नागरिकांच्या हातात अनेक बॅनर आणि पोस्टर्सही होते. बॅनरमवर 'China Lie, People Die' असे लिहिले होते.

भूसुरुंगाच्या स्फोटात नीमा तेन्झिन शहीद

नीमा तेन्झिन हे भारताच्या सुपर सिक्रेट विकास रेजिमेंटचे कमांडो होते. भारतीय लष्कारच्या आदेशानुसार ही स्पेशल फ्रंटियर फोर्स रेजिमेंट काम करते आहे. २९ - ३० ऑगस्टच्या रात्री, लडाखच्या पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चिनी सैनिकांची घुसखोरी रोखताना निमा तेन्झिन हे भूसुरुंगांच्या स्फोटात जखमी झाले.

खुनाच्या आरोपीची जमावाकडून हत्या, पोलिसांसमोरच घडला प्रकार

पँगाँग सरोवराजवळ चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या जवळ चीन आपल्या हालचाली वाढवण्याच्या प्रयत्नात होता. चिनी सैनिक या भागात घुसखोरीच्या उद्देशाने आले होते. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना पळून जाण्यास भाग पाडले. पण या संघर्षात एसएसएफचे कमांडो नीमा तेन्झिन हे शहीद झाले.

आत्मनिर्भर भारत : DRDO कडून 'हायपरसोनिक' तंत्रज्ञानाचं यशस्वी परिक्षण!

स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हणजे काय?

स्पेशल फ्रंटियर फोर्सचे कमांडो दलाई लामा, तिबेट आणि भारताचे निष्ठावान जवान आहेत. तिबेटी जवान शहीद झाल्यामुळेही ही फोर्स सध्या चर्चेत आहे. या फोर्समध्ये बहुतेक तिबेटी शरणार्थींची भरती केली जाते. १९५९ मध्ये चीनविरोधात पुकारलेला संघर्ष अयशस्वी ठरल्यानंतर दलाई लामांसोबत हजारो तिबेटी नागरिक भारतात आले होते. तेव्हापासून ते भारताला आपलं घर समजतात. भारतीय नागरिकही या फोर्सचा एक भाग आहेत. १९६२ च्या युद्धानंतर भारत-चीन युद्धानंतर लगेचच या फोर्सची स्थापना करण्यात आली. या फोर्समध्ये ३५०० जवानांचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज