नवी दिल्ली : 'भाजपचा हिंदू-मुस्लिम व्हायसर हा करोना व्हायरस पेक्षाही अधिक खतरनाक आहे. ना हिंदू वाचणार आहे ना मुस्लिम. भाजपच्या राज्यात प्रत्येक जण लुटला जाणार. एकीकडे तुम्हाला दंगलीत गुंतवले तर दुसरीकडे 'भारतीय जेबकतरा पार्टी'ने तुमचे पाकीट मारले, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी भाजपवर तोफ डागली. संजय सिंह यांनी येस बँकेच्या मुद्द्यावरून शनिवारी भाजपला लक्ष्य केले. संजय सिंह यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत भाजप हा 'पाकीटमारांचा' पक्ष आहे, अशी टीका केली.
‘एचएम’करोनापेक्षा भाजप अधिक भयंकर
'भाजपचा हिंदू-मुस्लिम व्हायसर हा करोना व्हायरस पेक्षाही अधिक खतरनाक आहे ना हिंदू वाचणार आहे ना मुस्लिम भाजपच्या राज्यात प्रत्येक जण लुटला जाणार...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2020, 4:00 am