अ‍ॅपशहर

अलिगढ विद्यापीठात जिनांच्या फोटोवरून वाद

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा फोटो लावण्यात आल्याने वाद सुरू झाला आहे. भाजपचे अलीगढचे खासदार सतीश गौतम यांनी या फोटोला आक्षेप घेतला असून विद्यापीठाला पत्र लिहून त्याबाबत जाब विचारला आहे.

Anuja Jaiswal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2018, 2:26 pm
अलीगढ: अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा फोटो लावण्यात आल्याने वाद सुरू झाला आहे. भाजपचे अलीगढचे खासदार सतीश गौतम यांनी या फोटोला आक्षेप घेतला असून विद्यापीठाला पत्र लिहून त्याबाबत जाब विचारला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp mp asks amu vc to explain compulsion of putting jinnah picture in amu
अलिगढ विद्यापीठात जिनांच्या फोटोवरून वाद


'अलीगढ मुस्लिम विद्यापीठात जिनांचा फोटो का लावण्यात आला? फोटोच लावायचा होता तर महाराणा प्रताप यांचा फोटो का लावला नाही?,' असा सवाल करतानाच महाराणा प्रताप यांनीच या विद्यापीठासाठी भूखंड दिला होता याकडेही सतीश गौतम यांनी विद्यापीठाचे लक्ष वेधले आहे. 'विद्यापीठात हा फोटो कुठे लावला हे महत्त्वाचे नाही. विद्यापीठात फोटो लावलेच कसे? हा मोठा सवाल आहे. फाळणीनंतर पाकिस्तानच्या संस्थापकांचा फोटो विद्यापीठात लावण्याचे काहीच कारण नाही,' असंही ते म्हणाले.

दरम्यान, 'विद्यापीठात छात्र संघ ही स्वतंत्र संघटना आहे. छात्रसंघाने १९२० मध्ये संघटनेचं आजीवन सदस्यत्व द्यायला सुरुवात केली होती. महात्मा गांधी आणि जिना यांनी या संघटनेचं आजीवन सदस्यत्व स्वीकारलं होतं. त्यानंतर तिथे जिनांचा फोटो लावण्यात आला होता,' असं विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी शैफी किडवई यांनी सांगितलं. तर 'फाळणीपूर्वी म्हणजे १९३८ मध्ये विद्यापीठात जिना यांचा फोटो लावण्यात आला होता. सध्या विद्यापीठात जिनांवर कोणताही धडा शिकविला जात नाही किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं जात नाही. तरीही सरकारने जिनांचा फोटो हटविण्याचा आदेश दिला तर त्याची अंमलबजावणी करू,' असं छात्रसंघाचे माजी अध्यक्ष फैजूल हसन यांनी सांगितलं.

'स्वातंत्र्यापूर्वी विद्यार्थी संघटनेने जिनांचा फोटो विद्यापीठात लावला होता. त्यामुळे विद्यार्थी संघटनेऐवजी खासदार सतीश गौतम यांनी याप्रकरणी कुलगुरुंना पत्र का लिहिलं? त्यांनी विद्यार्थी संघटनेला पत्र लिहायला हवं होतं. आम्ही त्याला रोखठोक उत्तर देऊ,' असं छात्र संघाचे अध्यक्ष मशकूर अहमद उस्मानी यांनी सांगितलं.

ही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा:
लेखकाबद्दल
Anuja Jaiswal

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज