अ‍ॅपशहर

बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय!

'मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहेच मात्र सध्या अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे. कदाचित आधीही अशाप्रकारच्या घटना घडत असतील मात्र त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत', असे विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2018, 1:48 pm
मथुरा :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hema-malini


'मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहेच मात्र सध्या अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे. कदाचित आधीही अशाप्रकारच्या घटना घडत असतील मात्र त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत', असे विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे.

मथुरा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या हेमा मालिनी यांना बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत विचारले असता त्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. ज्या घटना घडत आहेत. त्या रोखल्या पाहिजेत. अशा घटनांनी देशाचे नाव बदनाम होत आहे, असे त्या म्हणाल्या. बलात्काराच्या घटनांना प्रमाणापेक्षा अधिक प्रसिद्धी दिली जात असल्यावर त्यांनी आक्षेप घेतला.


दरम्यान, कठुआ, उन्नाव, सुरतनंतर मध्य प्रदेशातही अवघ्या ४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हेमा मालिनी यांच्या प्रतिक्रियेने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज