अ‍ॅपशहर

'भाजपमध्ये केवळ 'टू मॅन आर्मी'

भारतीय जनता पक्ष हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे. जेंव्हा या पक्षाचे संसदेत दोनच खासदार होते, तेंव्हा मी भाजपमध्ये सामिल झालो होतो, असं सांगतानाच सध्या भाजपमध्ये 'टु मॅन आर्मी'चं राज्य आहे, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता केली.

Maharashtra Times 14 Oct 2017, 8:23 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp mp shatrughan sinha attacks on bjp
'भाजपमध्ये केवळ 'टू मॅन आर्मी'


भारतीय जनता पक्ष हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे. जेंव्हा या पक्षाचे संसदेत दोनच खासदार होते, तेंव्हा मी भाजपमध्ये सामिल झालो होतो, असं सांगतानाच सध्या भाजपमध्ये 'टु मॅन आर्मी'चं राज्य आहे, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप नेतृत्वावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती व्हावेत असं पक्षातील ८० टक्के लोकांना वाटत होतं, असा दावाही त्यांनी केला. अडवाणी हेच आपले मित्र, दार्शनिक, मार्गदर्शक, गुरू आणि अखेरचे नेते असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मी काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधानांना भेटण्याचा प्रयत्न केला. मला वेळ देण्यात आला नाही. पण माझ्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान आले होते. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं ते म्हणाले. दोन वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी मला प्रचार करण्यास सांगितलं नव्हतं. त्यामुळे मी अमित शहा यांच्यासोबत मिटींग करण्याचा प्रयत्न केला होता. पण ही मिटींग झाली नाही, असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीत केवळ माझ्या एकट्याचा कोणी प्रचार केला नाही. केवळ माझी मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने माझा प्रचार केला आणि मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारचे दिवस भरलेत

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बिहारमधील जनतेत प्रचंड रोष आहे. या सरकारचे दिवस भरलेत असं बिहारची जनता म्हणत आहे, असं सांगतानाच बिहारचे लोक जीएसटी म्हणजे काय? असं एकमेकांना भोजपुरीत विचारत आहेत. त्यावर 'गईल सरकार तोहार' ( तुमचं सरकार गेलं) असं उत्तर मिळत आहे. हे सगळं पाहून मला आनंद होत नाही. तर वेदना होत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज