अ‍ॅपशहर

चार पिढ्यांच्या कामाचा हिशेब द्या: अमित शहा

‘राहुल गांधी यांनी नेहरू-गांधी राजकीय घराण्याच्या चार पिढ्यांनी बजावलेल्या कामगिरीचा हिशेब द्यावा,’ या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Maharashtra Times 17 Sep 2017, 6:03 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp president amit shaha critic on rahul gandhi
चार पिढ्यांच्या कामाचा हिशेब द्या: अमित शहा

वृत्तसंस्था, रांची

‘राहुल गांधी यांनी नेहरू-गांधी राजकीय घराण्याच्या चार पिढ्यांनी बजावलेल्या कामगिरीचा हिशेब द्यावा,’ या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

‘गरीब कल्याण मेला’ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले, ‘राहुल गांधी अमेरिकेत खूप बोलले; पण पहिल्यांदा त्यांनी ५० वर्षे देशावर राज्य केलेल्या नेहरू-गांधी घराण्यातील चार पिढ्यांचा हिशेब द्यावा.’ विकासाच्या बाबतीत भाजप सरकारच्या विविध कार्यक्रमांची माहिती देऊन ते म्हणाले, ‘भाजपने गेल्या तीन वर्षांत विविध विकास कार्यक्रम राबविले. पंतप्रधान मोदी विकासाच्या बाबतीत पहाडासारखे झारखंडच्या सोबत उभे आहेत.’ अमित शहा यांनी मुख्यमंत्री रघुवरदास यांच्या कामाची स्तुती केली. गुजरातनंतर ८.६ टक्क्यांनी विकासाचा दर ठेवण्यात झारखंडला यश आल्याबद्दल त्यांनी सरकारबद्दल गौरवोद्गार काढले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झारखंडची निर्मिती झाली आणि मोदी यांच्या काळात या राज्याचा विकास होत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज