अ‍ॅपशहर

लंकेश हत्या: गुहांना भाजपची नोटीस

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंध जोडल्याने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपने नोटीस बजावली असून गुहा यांनी बिनशर्त माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाई, असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.

Maharashtra Times 11 Sep 2017, 8:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp sends legal notice to ramchandra guha who linked gauri lankesh murder to sangh parivar
लंकेश हत्या: गुहांना भाजपची नोटीस


ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंध जोडल्याने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपने नोटीस बजावली असून गुहा यांनी बिनशर्त माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाई, असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.

नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या संघ परिवाराशी संबंधित लोकांनी केली होती. ते पाहता गौरी लंकेश यांचे मारेकरीही संघ परिवाराशी संबंधित असण्याची शक्यता असल्याचे विधान गुहा यांनी गेल्या आठवड्यात एका वेबसाइटशी बोलताना केले होते. त्यावरच आक्षेप घेत कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस करुणाकर खासले यांनी गुहा यांना नोटीस बजावली आहे. गुहा यांनी तीन दिवसांच्या आत माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

या सर्वच हत्यांचा तपास अपूर्ण आहे. असे असताना आपण केलेल्या चुकीच्या वक्तव्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले हजारो लोक व समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.


Atal Bihari Vajpayee said the answer to a book or article can only be another book or article. But we no longer live in Vajpayee's India — Ramachandra Guha (@Ram_Guha) September 11, 2017   In India today, independent writers and journalists are harassed, persecuted, and even killed. But we shall not be silenced. — Ramachandra Guha (@Ram_Guha) September 11, 2017
हा वाजपेयींचा भारत नाही: गुहा

एकीकडे भाजप युवा मोर्चाने नोटीस पाठवली असताना गुहा यांनी ट्विटरवरून अप्रत्यक्षपणे विद्यमान मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'एखाद्या पुस्तकाला वा लेखाला दुसऱ्या पुस्तकाने वा लेखानेच उत्तर द्यायला हवे, असे अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते मात्र आता वाजपेयींचा भारत राहिलेला नाही, असे ट्विट गुहा यांनी केले आहे. 'आज भारतात स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा छळ केला जात आहे. त्यांचा खून केला जात आहे. अशावेळी आपण गप्प बसून चालणार नाही', असेही गुहा यांनी नमूद केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज