अ‍ॅपशहर

गोव्यात भाजप, दिल्लीत आप

तीन राज्यांतील चार जागांसाठी २३ ऑगस्ट रोजी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत तीन जागा त्या त्या राज्यांतील सत्ताधारी राजकीय पक्षांनी राखल्याचे सोमवारी लागलेल्या निकालातून स्पष्ट झाले. तर एक जागा भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतली.

Maharashtra Times 29 Aug 2017, 3:21 am
वृत्तसंस्था, पणजी/ दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp wins both valpoi and panaji seats to take assembly
गोव्यात भाजप, दिल्लीत आप


तीन राज्यांतील चार जागांसाठी २३ ऑगस्ट रोजी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत तीन जागा त्या त्या राज्यांतील सत्ताधारी राजकीय पक्षांनी राखल्याचे सोमवारी लागलेल्या निकालातून स्पष्ट झाले. तर एक जागा भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतली.

संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या राजकारणात परतलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गिरिश चोडणकर यांचा ४,८०३ मतांनी पराभव केला. पर्रीकर यांच्या गोव्यात पुनरागमनानंतर पणजीचे आमदार सिद्धार्थ कंकळीकर यांनी त्यांच्यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. गोव्यातील वालपोई मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचे रॉय नाईक यांचा १०,०६६ मतांनी पराभव केला. याच मतदारसंघातून राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र निवडणुकीनंतर लगेचच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

आंध्रात तेलुगू देसम

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसम पार्टीने नंदयाल विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. भूमा ब्रह्मानंद रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसच्या माजी मंत्री शिल्पा चंद्र मोहन रेड्डी यांचा २७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. टीडीपीचे भूमा नागी रेड्डी यांचे मार्चमध्ये निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती.

केजरीवाल यांचे मनोबल उंचावणारा विजय

दिल्लीच्या बवाना विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेची ठरलेली पोटनिवडणूक सत्ताधारी आम आदमी पार्टीने जिंकली आहे. ‘आप’चे उमेदवार रामचंद्र यांनी भाजपचे वेद प्रकाश यांचा २४ हजार ५२ मतांनी दणदणीत पराभव केला. बवाना मतदारसंघातून ‘आप’च्या तिकीटावर निवडून आलेल्या वेद प्रकाश यांनी दिल्ली महापालिका निवडणुकांपूर्वी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपकडून पोटनिवडणूक लढली. या निवडणुकीत ‘आप’ आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली, तर काँग्रेसने ७.८ टक्के मतांवरून २४.२१ टक्क्यांवर झेप घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज