पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत बुधवारी बहुमत सिद्ध केले. याबाबतच्या ठरावाच्या बाजूने २० तर, विरोधात १५ मते पडली. मनोहर पर्रीकर यांच्या निधनांतर रविवारी काही तासांतच सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, विकासकामे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी आपल्याला सर्व आमदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन सावंत यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर केले. सद्यस्थितीत गोवा विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे ११ तर, काँग्रेसकडे १४ जागा आहेत.
गोव्यात भाजपचे बहुमत सिद्ध
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत बुधवारी बहुमत सिद्ध केले याबाबतच्या ठरावाच्या बाजूने २० तर, विरोधात १५ मते पडली...
MT 22 Mar 2019, 4:00 am