अ‍ॅपशहर

कोलकात्यात उर्जित पटेल यांना धक्काबुक्की

नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना आज कोलकात्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. कोलकाता विमानतळाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटेल यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला.

Maharashtra Times 15 Dec 2016, 8:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम black flags shown to rbi governor urjit patel at kolkata tour by congress workers
कोलकात्यात उर्जित पटेल यांना धक्काबुक्की


नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना आज कोलकात्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. कोलकाता विमानतळाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटेल यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना अटकाव करून पटेल यांना विमानतळावर नेऊन सोडले.


#WATCH: Congress workers protest against RBI Governor Urjit Patel at Kolkata Airport,show black flags pic.twitter.com/mxEwUdTbmG — ANI (@ANI_news) December 15, 2016
नोटाबंदीचा सर्वाधिक विरोध पश्चिम बंगालमधून झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि आमदार गुरुवारपासून कोलकात्यातील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेबर धरणे आंदोलन करत आहेत. राज्यात नोटांचा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीसाठी येथे आले होते. तेथे त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले.


Congress workers show black flags to RBI Governor Urjit Patel at Kolkata Airport. pic.twitter.com/LxzVhH0IIi — ANI (@ANI_news) December 15, 2016
रिझर्व्ह बँकेच्या गेटवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत पटेल यांना काळे झेंडे दाखवले. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पटेल यांच्याविरोधात निदर्शने केली. त्यानंतर पटेल यांना विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा सामना करावा लागला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. पटेल त्यांच्या कारमधून उतरताच काही कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले. पटेल यांना धक्काबुक्की करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. पटेल यांच्याभोवती कडे करून त्यांना विमानतळापर्यंत नेऊन सोडण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज