बंगळुरू : बऱ्याच ओढाताणीनंतर अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केलीय. आज दुपारी येडियुरप्पा राज्यपालांनी भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत. ही माहिती खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिलीय. 'मी राजानाम्याचा निर्णय घेतलाय. दुपारी भोजनेच्या वेळेनंतर मी राज्यपालांची भेट घेणार आहे' असं येडियुरप्पा यांनी भावूक होत म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, राज्यात आजच येडियुरप्पा सरकारनं आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. परंतु, याच दिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांनी नेतृत्वाच्या निर्णयासमोर माघार घेण्याचा निर्णय पक्का केलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या निश्चितीचा निर्णय सोमवारी सायंकाळपर्यंत होऊ शकेल.
'मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच विविध आव्हानांचा सामना करावा लागला; मात्र नागरिकांसाठी चांगलं काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला याचं समाधान आहे,' असं वक्तव्य मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी शनिवारी केलं होतं. तसंच येत्या सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा अंतिम दिवस असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले होते.