अ‍ॅपशहर

महू येथे संविधान मंदिर उभारा: आठवले

जगात अतुलनीय ठरलेल्या भारतीय संविधानाचे प्रत्येक पान नव्या पिढीला कळावे, यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू येथे संविधान मंदिर उभारण्यात यावं. त्यासाठी शासनाने येथे तीन एकर जमीन द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी येथे केली.

Maharashtra Times 2 May 2016, 9:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । महू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम built constitution temple in mahu ramdas athawale demands
महू येथे संविधान मंदिर उभारा: आठवले


'प्रत्येक धर्म धर्मग्रंथानुसार चालतात मात्र भारत देश संविधानानुसार चालतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधानच आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानामुळेच भारत अखंड असून प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जगात अतुलनीय ठरलेल्या भारतीय संविधानाचे प्रत्येक पान नव्या पिढीला कळावे, यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू येथे संविधान मंदिर उभारण्यात यावं. त्यासाठी शासनाने येथे तीन एकर जमीन द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी येथे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे कन्याकुमारी येथून काढण्यात आलेल्या भारत भीम यात्रेचा समारोप महू येथे झाला. त्यावेळी झालेल्या सभेत आठवले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, भय्यू महाराज उपस्थित होते.

दलित आदिवासींच्या आरक्षणाविरुद्ध सरकारने पाऊल उचलले तर भाजपविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन करू असा इशारा आठवले यांनी दिला. भाजप आणि पंतप्रधान मोदी आरक्षणाविरुद्ध नाहीत. त्यांचे सरकार संविधानानुसार काम करीत आहे. काँग्रेस त्याबाबत खोडसाळ प्रचार करीत आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज