अ‍ॅपशहर

'​आम्ही काही दूधखुळे नाही', CAAवरील भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींची तिखट प्रतिक्रिया​

नागरिकत्व सुधारणा कायद्याची ( CAA ) देशात लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असं भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अलिकडेच म्हणाले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सीएएला होत असलेल्या विरोध चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. त्यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Oct 2020, 6:20 pm
नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल (CAA) भूमिका स्पष्ट केलं. CAA कायद्यामुळे कोणालाही धोका नाही. देशात मुस्लिमात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे, असं भागवत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mohan bhagwat asaduddin owaisi
'आम्ही काही दुधखुळे नाही', CAAवरील भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींची तिखट प्रतिक्रिया


कुणीही आमची दिशाभूल करावी, इतके आम्ही काही लहान नाही. CAA + NRCचा अर्थ काय आहे? हे भाजपने स्पष्ट केलं नाही? हे फक्त मुस्लिमांसाठी नसेल तर कायद्यातून धर्म हा शब्द काढून टाकावा. भारतीय असल्याचं सिद्ध करण्याचे मुद्दे कायद्यात राहतील तोपर्यंत आम्ही निदर्शनं करत राहू. धर्माच्या आधारे लोकांचं नागरिकत्व निश्चित केलं जाईल, अशा सर्व कायद्यांना आम्ही विरोध करू, असं ओवैसी म्हणाले.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि आरजेडी (राष्ट्रीय जनता दल ) वर ओवैसींनी हल्ला केला. सीएएच्या निदर्शनांवेळी तुम्ही साधलेलं मौन नागरिक विसरणार नाहीत. हे मी कॉंग्रेस, आरजेडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्पष्ट करतो, असा इशारा ओवैसी यांनी दिला.

याआधी नागपुरात दसऱ्याचा कार्यक्रम झाला. देशात सीएएविरोधात निदर्शनं झाली. यामुळे समाजात तणाव निर्माण झाला. काही शेजारी देशांकडून जातीय कारणांमुळे छळ करून विस्थापित झालेल्यांना सीएएच्या माध्यमातून नागरिकत्व दिले जाईल. भारताच्या काही शेजारी देशांमध्ये जातीय छळाचा इतिहास आहे. तसंच नागरिकत्व दुरुस्ती कायद्या हा कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधात नाही, असं भागवत यांनी सांगितलं.

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींचा आरएसएसवर निशाणा

एक इंचही जमीन कुणाच्या हाती जाऊ देणार नाही, संरक्षण मंत्र्यांची शस्रपूजा

जे भारताचे नागरिक आहेत त्यांना या कायद्याने कोणताही धोका नाही. कोणी बाहेरून आलं असेल आणि भारताचं नागरिक व्हायचं असेल तर यासाठी तरतुदी आहेत. ज्या कायम आहेत. ती प्रक्रिया जशीच्या तशीच आहे, असं भागवत म्हणाले. तरीही काही संधीसाधू या कायद्याचा विरोध करत आहेत. देशात मुस्लिमांची संख्या वाढू नये म्हणून हा प्रयत्न असल्याचं वातावरण निर्माण केलं गेलं. यामुळे देशात या कायद्याला विरोध झाला आणि देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं, असं मोहन भागवत म्हणाले. सीएए कायद्यातून कुठला धार्मिक भेदभाव होत नाही, असं भागवत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज