अ‍ॅपशहर

सौराष्ट्रात दलितांचं कामबंद; दुर्गंधीचं साम्राज्य

गुजरातमधील ऊना येथे दलितांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून सौराष्ट्र आणि उत्तर गुजरात भागात दलितांनी काम बंद सुरू केलं आहे. त्यामुळं या भागांत मृत जनावरं रस्त्यावरच पडून असून दुर्गंधी आणि रोगराईचं साम्राज्य पसरू लागलं आहे. त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 4:31 pm
मटा ऑनलाइन वृत्त । राजकोट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cattle carcasses rot in gujarat as angry dalits stay away
सौराष्ट्रात दलितांचं कामबंद; दुर्गंधीचं साम्राज्य

गुजरातमधील ऊना येथे दलितांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून सौराष्ट्र आणि उत्तर गुजरात भागात दलितांनी काम बंद सुरू केलं आहे. त्यामुळं या भागांत मृत जनावरं रस्त्यावरच पडून असून दुर्गंधी आणि रोगराईचं साम्राज्य पसरू लागलं आहे. त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

सुरेंद्रनगरमधील गणपती रेल्वे क्रॉसिंगजवळ गाडीखाली आलेल्या एका म्हशीचा मृतदेह गेल्या काही दिवसापासून पडून आहे. त्यामधून खूप दुर्गंधी येत आहे. मात्र, दलितांनी आंदोलन छेडल्यानं कोणीही त्या म्हशीचा मृतदेह उचलण्यास तयार नाही. ऊना प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आम्ही मृत जनावरं उचलणं आणि त्यांची कातडी काढणं हे काम बंद केलं आहे,’ अशी माहिती लिंबडी येथील भाजपचे नगरसेवक धानजी मकवाना यांनी सांगितलं.

गुजरातमधील पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १ कोटी गायी आणि म्हशी आहेत. अभ्यासकांच्या माहितीनुसार दिवसाला सरासरी १० टक्के (२५००) जनावरांचा मृत्यू होतो. पांजरपोळमध्ये आजारी किंवा मरणासन्न जनावरे आणली जातात. मात्र, पांजपोळमधील कामगारांनी गायीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. लिंबडी परिसरातील ५० गावच्या सरपंचाना गायीचा मृतदेह न पाठवण्याचं निवेदन देण्यात आलं आहे.

गायीगुरांचे मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय कामगारांकडून अगदी काटेकोरपणे पाळला जात असल्याचं दलितांच्या हक्कांसाठी लढणारे नातू परमार यांनी सांगितलं. तर या प्रश्नावर काय तोडगा काढायचा यासाठी लवकरच बैठक बोलवणार असल्याचं गौ-रक्षक दलाचे सदस्य हरेश जोशी यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज