अ‍ॅपशहर

रणजीत सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांच्याविरोधात आज सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्याची चौकशी करताना पदाचा दुरुपयोग केल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप आहे.

Maharashtra Times 25 Apr 2017, 8:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cbi files corruption case against its former director ranjit sinha
रणजीत सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांच्याविरोधात आज सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्याची चौकशी करताना पदाचा दुरुपयोग केल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप आहे. आरोपींना सामील होऊन पुरावे नष्ट करण्यात आल्याने तसेच तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे पुरावे हाती लागल्याने सिन्हा गोत्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांपूर्वी सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सिन्हा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठाने नोंदवले होते. याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे विशेष संचालक एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पॅनल स्थापन करण्यात आले होते. या चौकशीनंतर रणजीत सिन्हा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. १९७४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सिन्हा २०१२ ते २०१४ या काळात सीबीआयचे संचालक होते.

दरम्यान, सीबीआयच्या माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मांस निर्यातदार मोइन कुरेशीला मनी लाँडरिंग प्रकरणात मदत केल्याचा सिंह यांच्यावर आरोप आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज