अ‍ॅपशहर

anil deshmukh : अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना CBI चे समन्स

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. या चौकशीची सुरवात त्यांच्या स्वीय सहाय्यकांपासून झाली आहे. सीबीआयने त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना समन्स बजावलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2021, 11:53 am
नवी दिल्लीः माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना सीबीआयने समन्स बजावले आहे. सीबीआय त्यांचा जबाब नोंदवून घेणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil deshmukh
अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना CBI चे समन्स


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी आता सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंह यांच्या केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला. हायकोर्टाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसंच अनिल देशमुखांवर झालेले आरोप हे गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. यामुळे अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशी होणार आहे.

supreme court anil deshmukh : महाराष्ट्र सरकारसह अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका,

supreme court : आंदोलनासाठी सार्वजनिक रस्ते अडवू नये, सुप्रीम कोर्टाची टीपणी

परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना नोटीस बजावली आहे. सीबीआय या दोघांचा जबाब नोंदवून घेणार आहे. त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढे जाऊन अनिल देशमुखांनाही सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज