अ‍ॅपशहर

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षा स्थगित

भारतातील सीबीएसईच्या या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक ३१ मार्चनंतर करोनाच्या व्याप्तीचा अभ्यास करून ठरवण्यात येईल, असेही 'सीबीएसई'ने स्पष्ट केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलीकडेच सीबीएसईला यासंदर्भातील निर्देश दिले होते.

Maharashtra Times 19 Mar 2020, 9:52 am
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सध्या सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. भारतातील सीबीएसईच्या या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक ३१ मार्चनंतर करोनाच्या व्याप्तीचा अभ्यास करून ठरवण्यात येईल, असेही 'सीबीएसई'ने स्पष्ट केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलीकडेच सीबीएसईला यासंदर्भातील निर्देश दिले होते. परीक्षा महत्त्वाच्या आहेतच; पण विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा त्याहून अधिक महत्त्वाची आहे, असा पवित्रा मंत्रालयाने घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्देशांवर मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व त्यानुसारच मंडळाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cbse-exam



करोना: ICSE बोर्डाचे पेपर शिक्षक घरून तपासणार

करोना आणि परीक्षा...पाहा एका क्लिकवर

हे १० प्रकारचे इंटरव्ह्यू कसे क्रॅक कराल?

MPSC पूर्व परीक्षा नियोजित वेळनुसारच होणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज