अ‍ॅपशहर

श्रीनगरमध्ये अतिरेकी आणि संरक्षण दलात चकमक

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पहाटे सुमारे ६.३० च्या सुमारास पाकिस्ताननं गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे श्रीनगरच्या पांथा चौकात आज पहाटेपासून दहशतवादी आणि संरक्षण दलात चकमक सुरू आहे. यात आतापर्यंत कोणी जखमी वा ठार झाल्याचं वृत्त नाही.

Maharashtra Times 25 Jun 2017, 4:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ceasefire violation by pakistan army in jks naushera sector along the line of control
श्रीनगरमध्ये अतिरेकी आणि संरक्षण दलात चकमक


जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पहाटे सुमारे ६.३० च्या सुमारास पाकिस्ताननं गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे श्रीनगरच्या पांथा चौकात आज पहाटेपासून दहशतवादी आणि संरक्षण दलात चकमक सुरू आहे. यात २ जवान जखमी झाले आहेत.

शुक्रवारी याच जागी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. शनिवारी पहाटेदेखील पूँछ क्षेत्रात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गाडीवर हल्ला केला होता, त्यानंतर ते डीपीएस श्रीनगरच्या दिशेने पळाले होते. त्यानंतर लष्करानं संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. यादरम्यान काही स्थानिकांनी सैनिकांवर दगडफेक केल्यानं या ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज