अ‍ॅपशहर

बेळगावचे प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचं 'एफ-१६' विमान पाडणारा भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याला वीर चक्र जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 3:26 pm
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे सीमारेषेवर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना खात्मा केला. परंतु, या चकमकीत बेळगाव जिल्ह्यातील जवान प्रकाश जाधव शहीद झाले. शहीद जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash


लाइव्ह अपडेट्स:

>> मुंबईचे मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेना पदक (शौर्य)

>> एसीपी राम जाधव, एसीपी राजाराम पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना राष्ट्रपती पदक

>> कॅप्टन महेशकुमार भुरे यांना शौर्य चक्र

>> मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवळकर, कॅप्टन प्रतीक रंजगावकर यांना सेना पदक

>> भायखळा जिल्हा तुरुंगाचे जितेंद्र काटे व कल्याण तुरुंगाचे अशोक ठाकूर यांना गुणवत्तापूर्ण पदक

>> सातारा जिल्हा तुरुंगाचे सुभेदार शकील अल्लाउद्दीन शेख यांना सर्वोत्तम सेवेचा पुरस्कार

>> हे आहेत मानाचे ६ शौर्य पुरस्कार
१. परमवीर चक्र
२. अशोक चक्र
३. महावीर चक्र
४. कीर्ती चक्र
५. वीर चक्र
६. शौर्य चक्र

>> शौर्य पुरस्कार...

>> बालाकोट एअरस्ट्राईक करणाऱ्या ५ वैमानिकांना शौर्यपदकं जाहीर

>> स्वातंत्र्यदिनी शौर्य पुरस्कार प्रदान करणार

>> स्‍क्‍वाड्रन लीडर मिनटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल

>> सीआरपीएफ कमांडेंट हर्षपाल सिंह यांना कीर्तीचक्र जाहीर

>> कुलगाम दहशतवादी हल्ल्यात जाधव शहीद

>> बेळगावचे शहीद जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तीचक्र

>> भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणारं पाकिस्तानचं एफ-१६ लढाऊ विमान अभिनंदन यांनी पाडलं

>>विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना वीरचक्र जाहीर

>> स्वातंत्र्यदिनी १४ शौर्य पुरस्कार प्रदान केले जाणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज