अ‍ॅपशहर

पर्रीकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री? भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा

गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचालींनो मोठा वेग आला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह गोव्यातील भाजपच्या नेत्यांनी गोव्याच्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्ष ३, गोवा फॉरवर्ड ३ आणि ३ अपक्ष अशा एकूण ९ आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे सांगत आपल्याकडे २१ इतके संख्याबळ असल्याचे भाजपने राज्यपालांना सांगितले आहे.

Maharashtra Times 12 Mar 2017, 9:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त। पणजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central minister nitin gadkari indicates manohar parrikar will be new cm of goa and claims for power in goa
पर्रीकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री? भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा


गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह गोव्यातील भाजपच्या नेत्यांनी गोव्याच्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ३, गोवा फॉरवर्ड पक्ष ३ आणि ३ अपक्ष अशा एकूण ९ आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे सांगत आपल्याकडे २१ इतके संख्याबळ असल्याचे भाजपने राज्यपालांना सांगितले आहे.

दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी अद्याप केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा राजीनामा दिला नसला तरी पर्रीकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट संकेत नितीन गडकरी यांनी आहेत.

गोव्यात स्थिर सरकार आणि विकास हवा असेल तर मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री बनवावे तरच आम्ही भाजपला पाठिंबा देऊ अशी अट महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि ३ अपक्षांनी भाजपला घातल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र याबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल असे गडकरी म्हणाले.

राज्यपालांच्या भेटीत भाजपने २१ आमदारांच्या सहीचे पत्रच राज्यपालांना दिल्याचे गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्यात पर्रीकरांनी उत्तम काम केले असून पर्रीकरांच्या मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याचे सांगत पर्रीकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री बनणार असे स्पष्ट संकेत गडकरी यांनी दिले आहेत.



गोव्यातील भाजपच्या मित्रपक्षांनी मनोहर पर्रीकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले. मात्र, पर्रीकर यांनी अद्याप आपल्या संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसल्याचेही गडकरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू असून मनोहर पर्रीकर याच्या राजीनाम्याचे वृत्त कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज