अ‍ॅपशहर

​ ‘सीव्हीसी’ करणार खासगी बँकांचीही चौकशी

केंद्र सरकारी कर्मचा‍ऱ्यांचा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्यरत असलेला केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आता भ्रष्टाचारप्रकरणी खासगी बँका व त्यांच्या कर्मचा‍ऱ्यांचीही चौकशी करू शकणार आहे. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील तरतुदींना नुकतीच मंजुरी दिली असल्याचे दक्षता आयुक्त टी. एम. भसीन यांनी सांगितले.

Maharashtra Times 27 Jun 2017, 7:04 am
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचा‍ऱ्यांचा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्यरत असलेला केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आता भ्रष्टाचारप्रकरणी खासगी बँका व त्यांच्या कर्मचा‍ऱ्यांचीही चौकशी करू शकणार आहे. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील तरतुदींना नुकतीच मंजुरी दिली असल्याचे दक्षता आयुक्त टी. एम. भसीन यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central vigilance commission
​ ‘सीव्हीसी’ करणार खासगी बँकांचीही चौकशी


सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या एका निकालानुसार ‘सीव्हीसी’ला हा अधिकार मिळाला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत कोणत्याही खासगी बँकेचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य अधिका‍री व कर्मचारी सरकारी नोकरच आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या निकालानुसार, खासगी बँका आणि त्यांच्या व्यवस्थापकीय अधिका‍ऱ्यांसह कर्मचा‍ऱ्यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी सीव्हीसी करू शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज