अ‍ॅपशहर

६५ हजारांच्या स्कूटीला १ लाखांचा दंड

देशात १ सप्टेंबरपासून नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना भल्या मोठ्या रकमेचा दंड भरावा लागत आहे. ओडिशात एका तरुणीने ६५ हजारांची स्कूटी खऱेदी केली. शोरूमबाहेर आल्यानंतर नंबर प्लेट नसल्याच्या कारणावरून पोलिसांनी तब्बल १ लाखांचा दंड ठोठावला आहे. ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2019, 4:37 pm
नवी दिल्लीः देशात १ सप्टेंबरपासून नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना भल्या मोठ्या रकमेचा दंड भरावा लागत आहे. ओडिशात एका तरुणीने ६५ हजारांची स्कूटी खऱेदी केली. शोरूमबाहेर आल्यानंतर नंबर प्लेट नसल्याच्या कारणावरून पोलिसांनी तब्बल १ लाखांचा दंड ठोठावला आहे. ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scooty


१२ सप्टेंबर रोजी कटक या ठिकाणी चेक पोस्टवर तपासणी करणाऱ्या वाहन परिवहन अधिकाऱ्यांनी स्कूटी चालवणाऱ्या अरूण पांडा यांना रोखले. त्यांच्याकडे स्कूटीच्या रजिस्ट्रेशन नंबरची मागणी केली. त्यांच्याकडे ती नसल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना एक लाखांचा दंड ठोठावला. ही स्कूटी कविता पांडे यांच्या नावाने खरेदी करण्यात आली होती. दंड ठोठावल्यानंतर कविता पांडे यांनी सर्व खापर डीलरवर फोडले. डीलरने रजिस्ट्रेशन नंबर दिला नाही त्यामुळे दंडाची रक्कम डीलरवर लावण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. आरटीओ अधिकाऱ्याने हा दंड डीलरला भरण्यास सांगितले आहे.

नवीन मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डीलरला केवळ दंडच ठोठावला नाही तर त्याचा दुकानाचा परवानाही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणतीही कागदपत्रे नसताना स्कूटरची डिलिव्हरी कशी काय केली? असे सांगत एक लाखांचा दंड भरण्यास सांगितले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज