अ‍ॅपशहर

चांद्रयान -२ चा आणखी एक टप्पा सर; पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश

भारतासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या चांद्रयान मोहिमेतील आज आणखी एक टप्पा सर झाला असून, चांद्रयान २ ने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2019, 9:14 pm
बेंगळुरूः भारतासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या चांद्रयान मोहिमेतील आज आणखी एक टप्पा पार केला असून, चांद्रयान २ ने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrayan-2


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी चांद्र मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी या यानाने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला. पुढचा कक्षा बदल ६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. यापूर्वी २४ आणि २६ जुलै रोजी चांद्रयान २ ने पृथ्वीच्या पहिल्या आणि दुसऱ्या कक्षा बदलाचा टप्पा पार केला होता. १४ ऑगस्ट रोजी चांद्रयान २ पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले.

प्रोपेलिंग यंत्रणेचा वापर करून चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी चांद्रयान २ ची गती कमी करण्यात येईल. ३ सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. ७ सप्टेंबर रोजी लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही इस्रोकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज