अ‍ॅपशहर

चंदू चव्हाण यांना तीन महिन्याची शिक्षा

सर्जिकल स्ट्राइक नंतर नजरचुकीने भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना ८९ दिवसाची म्हणजे तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी दोषी चंदू चव्हाण दोषी आढळल्याने भारतीय लष्करी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Maharashtra Times 26 Oct 2017, 8:39 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandu babulal chohan gets punishment under court martial
चंदू चव्हाण यांना तीन महिन्याची शिक्षा


सर्जिकल स्ट्राइक नंतर नजरचुकीने भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना ८९ दिवसाची म्हणजे तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी दोषी चंदू चव्हाण दोषी आढळल्याने भारतीय लष्करी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

भारताने २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २९ सप्टेंबरला चंदू चव्हाण नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेले. मात्र भारत सरकारने पूर्ण ताकद पणाला लावून चंदू चव्हाण यांना २१ जानेवारी २०१७ रोजी भारतात आणलं. त्यानंतर चव्हाण यांच्यावर कोर्ट मार्शल करण्यात आलं. त्यांच्याविरोधात लष्करी न्यायालयाने खटला भरला. त्यात चव्हाण दोषी आढळले. त्यामुळे त्यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्यावर अंतिम शिक्कमोर्तब होणं बाकी आहे. संबंधित अधिकारी/कार्यालय या शिक्षेचा कालावधी कमी-जास्त करुन, शिक्षेला अंतिम रुप देतील. जर चव्हाण यांच्या तीन महिन्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली, तर साधारण ४ महिने पाकिस्तानी जेलमध्ये काढणाऱ्या चव्हाण यांना भारतातही तीन महिने जेलमध्ये राहावं लागणार आहे.

चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत. ते ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असून ते जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. ते २०१२ मध्ये सैन्यात भरती झाले. २२ वर्षीय यांनी सीमा ओलांडण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. त्यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या ९ मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज