अहमदाबाद : गुजरातचे माजी आमदार जयंती भानुशाली यांच्या हत्येप्रकरणी माजी भाजप नेते छबील पटेल यांना गुरुवारी अटक करण्यात आली. पटेल यांनी हत्येची कबुली दिली आहे. भानुशाली यांची आठ जानेवारी रोजी धावत्या रेल्वेत हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी दोन जानेवारीला पटेल हे मस्कतला पळून गेले होते. तेथून ते १० जानेवारीला अमेरिकेत गेले आणि त्यांच्या मुलीबरोबर राहात होते. आज सकाळी ते अहमदाबाद विमानतळावर उतरले. तेथेच त्यांना अटक करण्यात आली.
छबील पटेल यांना अटक
गुजरातचे माजी आमदार जयंती भानुशाली यांच्या हत्येप्रकरणी माजी भाजप नेते छबील पटेल यांना गुरुवारी अटक करण्यात आली पटेल यांनी हत्येची कबुली दिली आहे...
MT 15 Mar 2019, 4:00 am