अ‍ॅपशहर

डॉक्टरांनी जिवंत महिलेला मृत घोषित केलं, चितेवर ठेवल्यावर श्वास सुरू होता

करोनाने अनेक राज्यांमध्ये स्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जिवंत महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2021, 1:43 am
रायपूरः छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी एका ७२ वर्षांच्या महिलेला मृत घोषित केलं. पण महिलेला चितेवर ठेवल्यावर तिचा श्वास सुरू असल्याचं कुटुंबीयांना लक्षात आलं. त्यांनी लगेच तिला घेऊन हॉस्पिटल गाठलं. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raipur hospital
डॉक्टरांनी जिवंत महिलेला मृत घोषित केलं, चितेवर ठेवल्यावर श्वास सुरू होता


ही घटना रायपूरमधील मेकाहारा हॉस्पिटलमधील आहे. ७२ वर्षांच्या लक्ष्मी अग्रवाल या बुधवारी दुपारी जेवण करता करता बेशुद्ध झाल्या. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना लगेच मेकाहारा हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर महिलेचा मृतदेह अॅम्ब्युलन्सद्वारे स्मशानात नेण्यात आला. अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत होती. महिलेला उचलून चितेवर ठेवण्यात आलं. पण यावेळी त्यांच्या शरीरात हालचाली दिसून आल्या. बारकाईने तपासल्यावर त्यांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासही सुरू होता.

लक्ष्मी अग्रवाल या जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतली. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. यावेळी डॉक्टरांना एका रुग्णाला काही तासांत दोनवेळा मृत घोषित करावं लागलं.

महिलेचे कुटुंबीय डॉक्टरांच्या या वर्तनाने अतिशय दुःखी आहेत. डॉक्टरांनी जेव्हा त्यांना मृत घोषित केलं तेव्हा त्या जिवंत होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी उपचार केला असता तर त्यांचा जीव वाचला असता, असं कुटुंबीय म्हणाले. हॉस्पिटलच्या हलगर्जीपणावरून नागरिकांनी टीका केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज