अ‍ॅपशहर

'हे तर भाजपचे सेलिब्रेशन, शिवसेना कुठेय?'

शिवसेना, भाजपतील अंतर्गत धुसफूशिवर बोट ठेवत काँग्रेसने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसह भाजपवर निशाणा साधाला आहे. 'केंद्र सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पण यात एनडीएतील एकाही घटक पक्षाचा समावेश नाही.

Maharashtra Times 28 May 2016, 10:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chidambaram attacks on modi government
'हे तर भाजपचे सेलिब्रेशन, शिवसेना कुठेय?'


शिवसेना, भाजपतील अंतर्गत धुसफूशिवर बोट ठेवत काँग्रेसने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसह भाजपवर निशाणा साधाला आहे. 'केंद्र सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पण यात एनडीएतील एकाही घटक पक्षाचा समावेश नाही. विशेष म्हणजे शिवसेनाही या सेलिब्रेशनमध्ये कुठे दिसून येत नाही', असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी लगाला आहे.

'भाजप, शिवसेनेतील संबंध तणाले गेले आहेत. यामुळे केंद्रातील सरकारचे सेलिब्रेशन हे फक्त भाजपचेच आहे. नाराज शिवसेना यात कुठेही सहभागी झालेली नाही', असं चिदम्बरम म्हणाले. 'निवडणुकीत जनतेला मोठ-मोठी आश्वासनं दिली गेली. पण सर्वच पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे. रोजगार निर्मिती, कृषी उत्पादन घसरले, वार्षिक उत्पादन विक्री दर घटला आहे. शिवाय दुष्काळामुळे देशातील शेतकरी आणि जनता होरपळत असताना सरकारला सेलिब्रेशन करणं शोभतं का?', असा सवाल चिदम्बरम यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज