अ‍ॅपशहर

चिदंबरम यांची १३ देशांत मालमत्ता; 'ईडी'चे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात चौकशी सुरू असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची विदेशातही संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सहआरोपींसह चिदंबरम यांनी परदेशात संपत्ती विकणे आणि परदेशी बँक खाती बंद केल्याच्या पुराव्याशी छेडछाड केली आहे. चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना ईडीने हा युक्तीवाद केला आहे.

Amit Anand Choudhary | TNN 27 Aug 2019, 1:04 pm
नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात चौकशी सुरू असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची विदेशातही संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सहआरोपींसह चिदंबरम यांनी परदेशात संपत्ती विकणे आणि परदेशी बँक खाती बंद केल्याच्या पुराव्याशी छेडछाड केली आहे. चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना ईडीने सुप्रीम कोर्टात हा युक्तीवाद केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chidambaram1


चिदंबरम यांची बँक खाती अनेक देशांमध्ये आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रीया, ब्रिटीश वर्जिन, आइसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलीपाइन्स,सिंगापूर, द. आफ्रिका, स्पेन, श्रीलंका या देशांत त्यांनी मालमत्ता बनवून बँक खातीही उघडली आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या खात्यांमध्ये देण्या-घेण्याचे व्यवहार झाले आहेत, असं ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप लावला आहे. ईडीच्या प्रतिज्ञापत्रावरून असे दिसत आहे की ईडीचा फास हळूहळू चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्यापर्यंतदेखील पोहोचणार आहे. कार्ती यांना तूर्त मद्रास हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज