मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी मनीष खुराणा यांच्या कोर्टात दिल्ली सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने या प्रकरणाची पुढील कार्यवाही सुरू करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती पोलिसांनी केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी दिल्लीच्या पोलिस उपआयुक्तांनी या बाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. विद्यापीठाच्या परिसरात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी देशविरोधी घोषणा दिल्यामुळे १४ जानेवारी रोजी पोलिसांनी कन्हैया कुमार. उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्याविरोधात देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल केले होते.
मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी मनीष खुराणा
मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी मनीष खुराणा यांच्या कोर्टात दिल्ली सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू करण्यास परवानगी दिली ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2019, 4:00 am