अ‍ॅपशहर

FBवर 'बीफ पार्टी'ची पोस्ट; नोकरीच गेली!

फेसबुकवर बीफ पार्टीबद्दलची पोस्ट टाकणं जमशेदपूर येथील ग्रॅज्युएट स्कूल कॉलेजच्या एका प्राध्यापिकेला महागात पडलं आहे. या प्रकरणी कॉलेजच्या व्यवस्थापनानं पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीचं समाधानकारक उत्तर न देता आल्यानं संबंधित प्राध्यापिकेला नोकरी गमवावी लागली आहे.

Maharashtra Times 13 Aug 2017, 3:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जमशेदपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम college lecturer in jharkhand sacked over facebook post saying he wanted to host beef party
FBवर 'बीफ पार्टी'ची पोस्ट; नोकरीच गेली!


फेसबुकवर बीफ पार्टीबद्दलची पोस्ट टाकणं जमशेदपूर येथील ग्रॅज्युएट स्कूल कॉलेजच्या एका प्राध्यापिकेला महागात पडलं आहे. या प्रकरणी कॉलेजच्या व्यवस्थापनानं पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीचं समाधानकारक उत्तर न देता आल्यानं संबंधित प्राध्यापिकेला नोकरी गमवावी लागली आहे.

मागील मे महिन्यात प्रा. हंसदा यांनी 'मला मित्रांसाठी बीफ पार्टीचं आयोजन करायचं आहे' अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. सरकारनं गोहत्येवर बंदी आणूनही हंसदा यांनी बीफ पार्टीचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व उजव्या विचाराच्या संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसंच, हंसदा यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर कॉलेजकडून त्यांना नोटीस बजावून या पोस्टबद्दल खुलासा करण्यास सांगितलं होतं. पण तिच्या उत्तरानं कॉलेजचं समाधान झालं नाही. त्यामुळं त्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात, हंसदा यांचा कॉलेजसोबतचा करार गुरुवारी संपणार होता. मात्र, एफबी पोस्टबद्दलचा त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यानं तो करार वाढविण्यास व्यवस्थापनानं नकार दिला.

हंसदा यांनी कॉलेज व्यवस्थापनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज