अ‍ॅपशहर

मोदींना क्लीन चिट देण्यावरून आयोगातच मतभेद होते

जवानांच्या नावाने मतं मागत असल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली असली तरी मोदींना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगाच्या पॅनलमध्येच मतभेद होते, अशी माहिती समोर आली आहे. पॅनलमधील एका सदस्याने मोदींचं भाषण आक्षेपार्ह असल्याचं मत नोंदवलं होतं. मात्र २-१च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 9:27 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम election-commission1

जवानांच्या नावाने मतं मागत असल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली असली तरी मोदींना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगाच्या पॅनलमध्येच मतभेद होते, अशी माहिती समोर आली आहे. पॅनलमधील एका सदस्याने मोदींचं भाषण आक्षेपार्ह असल्याचं मत नोंदवलं होतं. मात्र २-१च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील वर्धा येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमध्ये अल्पसंख्याक मतदार अधिक असल्यानेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तिकडून निवडणूक लढत असल्याचं म्हटलं होतं. तसंच ९ एप्रिल रोजी लातूर येथे झालेल्या रॅलीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना बालाकोट स्ट्राइक लक्षात ठेवून मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. या दोन्ही वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

त्यावर निवडणूक आयोगाच्या पॅनेलसमोर चर्चाही झाली. या पॅनलमधील एका सदस्याने मोदींना क्लीन चिट देण्यास विरोध केला होता. मात्र २-१च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पॅनलमध्ये सुनील आरोरा, अशोक लवासा आणि सुशील चंद्रा आदींचा समावेश होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज