अ‍ॅपशहर

Congress in NorthEast: ईशान्येतून काँग्रेस गायब

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये प्रस्थापित भाजपला सत्तेवरून खाली खेचणाऱ्या काँग्रेसला मिझोरमसारख्या लहान राज्यात मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेली १० वर्षे या राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत ४० पैकी केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या खात्यात ३४ जागा होत्या. विरोधी नेते झोरामथंगा हे मिझो नॅशनल फ्रंटच्या (एमएनएफ) विजयाचे शिल्पकार ठरले.

PTI 12 Dec 2018, 3:26 am
वृत्तसंस्था, ऐझवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress disappears from the northeast
Congress in NorthEast: ईशान्येतून काँग्रेस गायब

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये प्रस्थापित भाजपला सत्तेवरून खाली खेचणाऱ्या काँग्रेसला मिझोरमसारख्या लहान राज्यात मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेली १० वर्षे या राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत ४० पैकी केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या खात्यात ३४ जागा होत्या. विरोधी नेते झोरामथंगा हे मिझो नॅशनल फ्रंटच्या (एमएनएफ) विजयाचे शिल्पकार ठरले.

एमएनएफने या निवडणुकीत पाच जागांवरून २६ जागांवर मुसंडी मारत एकहाती सत्ता प्राप्त केली. या झंझावातात मावळते मुख्यमंत्री लालथानहावला यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झाला. भाजपने एक जागा जिंकत या राज्यात खाते उघडले.

एकूण जागा ४०

एमएनएफ - २६

अन्य - ८

काँग्रेस - ५

भाजप - १

पुन्हा दारुबंदी

राज्यात पुन्हा संपूर्ण दारुबंदी लागू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार झोरामथंगा यांनी या विजयानंतर केली. एमएनएफने १० वर्षांपूर्वी केलेली दारुबंदी काँग्रेसने २०१५मध्ये मागे घेतली होती. या निवडणुकीत दारुबंदीचा मुद्दा अतिशय गाजला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज