अ‍ॅपशहर

काँग्रेसचे कर्मचारी दोन महिन्यांपासून पगाराविना

भारतीय काँग्रेस पक्ष सध्या आर्थिक संकटात सापडला आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, काँग्रेसच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेलं नाही. याआधीही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आर्थिक पेचात सापडल्याचं समोर आलं होतं. तेव्हाही कर्मचाऱ्यांचे पगार थकवण्यात आले होते.

Maharashtra Times 11 Jul 2017, 8:34 am
मटा ऑनलाइन वृत्त | लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress is struggling to pay salaries of employees in lucknow offuce
काँग्रेसचे कर्मचारी दोन महिन्यांपासून पगाराविना


भारतीय काँग्रेस पक्ष सध्या आर्थिक संकटात सापडला आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेलं नाही. याआधीही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आर्थिक पेचात सापडल्याचं समोर आलं होतं. तेव्हाही कर्मचाऱ्यांचे पगार थकवण्यात आले होते.

काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दरमहा ६ लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देण्यात येतात. पण गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार का देण्यात आला नाही. याचं स्पष्टीकरण देण्यास कोणीही तयार नाही. मात्र, कार्यालयाच्या कोषाध्यक्षांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा गोंधळ उडाल्याची माहिती काँग्रेस कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीही याप्रकरणात लक्ष न दिल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे महामंत्री प्रमोद सिंह यांनी हे प्रकरण किरकोळ असून प्रदेशाध्यक्षांशी बोलून कर्मचाऱ्याचं वेतन त्वरित दिलं जाईल, असं सांगितलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज