अ‍ॅपशहर

charanjit singh channi : पंजाबला मिळाला नवा ‘सिंग’; मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर

अखेर पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे. चरणजीत सिंग चन्नी हे नवे मुख्यमंत्री असणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते यासंबंधी लवकरच राजभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत. काँग्रेस नेते हरीश रावत यांनी माहिती दिलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2021, 9:54 pm
नवी दिल्लीः पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. चरणजीत सिंग चन्नी हे नवे मुख्यमंत्री असतील, असं रावत यांनी ट्वीट करून सांगतिलं आहे. पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी चरणजीत सिंग चन्नी यांची एकमताने निवड झाली आहे, असं रावत यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress leader charanjit singh channi to be new punjab chief minister
धक्कादायक निर्णय! चरणजीत चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, रावत यांची घोषणा


चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत हे वरिष्ठ नेत्यांसह राज्यपालांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता ही भेट होणार आहे.

चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर आता आणखी माहिती समोर आली आहे. पंजाबमध्ये आता दोन उपमुख्यमंत्री असतील. हे दोन मुख्यमंत्री कोण असतील? यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उद्या सकाळी चन्नी यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ ठरवलं जाईल, असं हरीश रावत म्हणाले. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सहमतीनंतर चन्नी यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसंच अमरिंदर सिंग आपण भेट घेणार आहोत. अमरिंदर सिंग हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना सोबत घेऊ काम करू, असं रावत म्हणाले.

चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले सुखजिंदर सिंग रंधवा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाने आपल्याला आनंद झाल्याचं ते म्हणाले. ज्यांनी मला समर्थन दिले, त्या सर्व आमदारांचा मी आभारी आहे. चन्नी माझे बंधू आहेत, असं रंधवा म्हणाले.

मुख्यमंत्रीपदासाठी काही तासांपूर्वी सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाची चर्चा होती. पण रंधवा यांच्या नावाला काही आमदारांनी समर्थन दिले नाही, असं बोललं जातंय. तसंच नव्या मुख्यमंत्र्यांना जास्तीत जास्त आमदारांचे समर्थन मिळेल, याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांडकडून करण्यात आला. यातूनच मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याचे नाव निश्चित करण्यात आले.

ambika soni : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर का नाकारली? स्वतः अंबिका सोनींनी सांगितलं

जेडब्ल्यू मॅरियटमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चरणजीत सिंग चन्नी यांना पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारपासून बैठकीसंदर्भातील गोंधळ वाढला होता. चरणजीत सिंग चन्नी आणि परगट सिंग यांच्यासह काँग्रेसचे आमदार आणि नेते दुपारनंतर जेडब्ल्यू मॅरियटमध्ये पोहोचले. हरीश रावत आणि अजय माकन तिथे आधीच उपस्थित होते.

punjab congress crisis : सोनिया भर बैठकीत राहुल गांधींना म्हणाल्या, 'विसरू नका...'

मुख्यमंत्र्यांच्या निवडीसंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. पण काही वेळानंतर बैठकीत घेतलेला निर्णय बाहेर आला आणि चन्नी यांची पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. म्हणजेच त्यांची राज्याचे मुख्यमंत्रीपदी निवड केली गेली.

महत्वाचे लेख