अ‍ॅपशहर

कट्टरपंथी द्वेषात आंधळे; राहुल गांधींची पीयूष गोयल यांच्यावर टीका

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यावर टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. हे कट्टरपंथी द्वेषात आंधळे झाले आहेत. जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्ती काय असतात, याचा साधा अंदाजही यांना नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2019, 4:35 pm
नवी दिल्ली: भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यावर टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. हे कट्टरपंथी द्वेषात आंधळे झाले आहेत. जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्ती काय असतात, याचा साधा अंदाजही यांना नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rahul-Gandhi


अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जींबद्दल टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. अभिजीत बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असल्याची टीका गोयल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर बॅनर्जी यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. केंद्रीय मंत्र्यांनी माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असं ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी ट्विट करून गोयल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 'बॅनर्जी, हे कट्टरपंथी द्वेषात आंधळे झाले आहेत. एखाद्या तज्ज्ञ, जाणकार व्यक्ती काय असते, हे त्यांना ठाऊक नाही. तुम्ही एक दशक यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते ही बाब समजू शकत नाहीत. तुम्ही करत असलेल्या कामामुळं लाखो भारतीयांना तुमच्याबद्दल अभिमान वाटतो,'असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अभिजीत बॅनर्जी हे डाव्या विचारांचे असल्याची टिप्पणी गोयल यांनी केली होती. नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल मी अभिजीत बॅनर्जी यांचे अभिनंदन करतो. त्यांची विचार करण्याची शैली ही पूर्णतः डावी आहे. बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या 'न्याय' या दारिद्र्य निर्मुलन योजनेला पाठिंबा दर्शवला आहे. बॅनर्जी यांची विचारसरणी भारतीयांनी नाकारली आहे, असंही गोयल म्हणाले होते. त्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनीही गोयल यांच्या टिप्पणीचा संदर्भ देत सरकारवर टीका केली होती. सरकारचे काम सर्कस चालवण्याचे नसून, अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे आहे, असा जोरदार टोला प्रियांका गांधी यांनी लगावला होता. भाजप नेते दुसऱ्यांचं योगदान नाकारण्याचं काम करत आहेत. त्यांनी इतरांचं योगदान नाकारण्यापेक्षा जनतेने जे काम सोपवलंय ते करावं. नोबेल पुरस्कार विजेत्याने त्यांचं काम प्रामाणिकपणे केलंय. त्यामुळेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय. अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळत आहे. अर्थव्यवस्था सांभाळणं तुमचं काम आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नव्हे, असं त्या म्हणाल्या होत्या.

अभिजीत बॅनर्जी डाव्या विचारांचे: गोयल

अर्थव्यवस्था म्हणजे कॉमेडी सर्कस नव्हे: प्रियांका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज