अ‍ॅपशहर

राहुल गांधी यांचं आज राजघाटावर उपोषण

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ भाजपने १२ एप्रिल रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच देशभरात निर्माण झालेला धार्मिक तणाव आणि दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसीय उपोषण करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर राहुल उपोषणाला बसणार असून काँग्रेसचे कार्यकर्तेही आज देशभरात उपोषण करणार असल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2018, 9:24 am
नवी दिल्ली: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ भाजपने १२ एप्रिल रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच देशभरात निर्माण झालेला धार्मिक तणाव आणि दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसीय उपोषण करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर राहुल उपोषणाला बसणार असून काँग्रेसचे कार्यकर्तेही आज देशभरात उपोषण करणार असल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-fast1


कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत राहुल यांनी दलितांच्या मुद्द्यावरून उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राहुल यांच्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेही एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. तसेच काँग्रेस कार्यकर्ते सर्व राज्य आणि जिल्हा कार्यालयांवर निदर्शने करणार आहेत.

नरेंद्र मोदी सरकारने संसदेचं कामकाज चालू दिलं नाही. त्यामुळे पीएनबी घोटाळा, सीबीएसई पेपर लीक, कावेरी मुद्दा, अॅट्रॉसिटी कायदा आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणं आदी मुद्द्यावर चर्चा होऊ शकली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.


२०१९ साठी दलित मतांवर नजर

२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे दलितांची मते हातची जाऊ नयेत म्हणून काँग्रेस आणि भाजपनं राजकारण सुरू केलं आहे. त्यामुळेच काँग्रेस दलितांसाठी उपोषण करत असून भाजपनं आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज