अ‍ॅपशहर

पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला आहे. नितीन सुभाष असं या जवानाचं नाव असून ते महाराष्ट्रातील सांगलीचे सुपुत्र होते.

Maharashtra Times 29 Oct 2016, 2:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू-काश्मीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम constable nitin subhash of bsf lost his life
पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान शहीद


जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला आहे. नितीन सुभाष असं या जवानाचं नाव असून ते महाराष्ट्रातील सांगलीचे सुपुत्र होते.

माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काल संध्याकाळी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात '१७ शीख लाइट इन्फंट्री'चे जवान मनजीत सिंह यांना वीरमरण आले. तर, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या साथीनं दहशतवाद्यांचा सामना करताना नितीन सुभाष गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज