अ‍ॅपशहर

संसदेच्या कामकाजात अडथळा स्वीकारार्ह नाही: राष्ट्रपती

संसदेच्या कामाकाचा कोणत्याही प्रकारचा अडथळा स्वीकारार्ह नाही, असे सांगत नेत्यांना जनता धरणे धरायला निवडून देत नाही, अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेत्यांना खडसावले आहे. डिफेन्स इस्टेट्स ऑर्गनायझेशनच्या एका बैठकीत ते बोलत होते.

Maharashtra Times 8 Dec 2016, 4:02 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम continuous disruption of parliament proceedings was not acceptable mukherjee
संसदेच्या कामकाजात अडथळा स्वीकारार्ह नाही: राष्ट्रपती


संसदेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा अडथळा स्वीकारार्ह नाही, असे सांगत नेत्यांना जनता धरणे धरायला निवडून देत नाही, अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेत्यांना खडसावले आहे.

डिफेन्स इस्टेट्स ऑर्गनायझेशनच्या एका बैठकीत ते बोलत होते. 'तुम्हाला जे काम करण्यासाठी निवडून दिले जाते, कृपा करून तेच काम करा. तुम्हाला संसद चालवण्यासाठी जनता निवडून देते, बंद पाडण्यासाठी नव्हे,' असे ते म्हणाले. कोणत्याही एका व्यक्तीकडे माझा रोख नाही, पण संसदेच्या कामात अडथळा आणणे ही आता सवय होऊन गेली आहे. संसदीय कामात व्यत्यय आणून लोकशाही स्वातंत्र्याचा गैरवापर केला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी ते महिला आरक्षण विधेयकाबद्दलही बोलले. विधेयकाचे मुखर्जी यांनी समर्थन केले, पण ते दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नाराजी व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयक संसदेस मंजुरीविना दीर्घकाळ पडून आहे, असे ते म्हणाले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहात नोटाबंदीच्या निर्णयावरून गदारोळ सुरू आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीवर बोलावे या मागणीसाठी अजूनही कामकाजाला सुरुवात झालेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज