अ‍ॅपशहर

पोलिसाच्या मुलाचा मायलेकींवर ३ आठवडे बलात्कार

तान्ह्या बाळाला चालत्या रिक्षातून फेकून तिच्या आईवर अत्याचार केल्याचं प्रकरण ताजं असतानाच गुरुग्राममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पोलिसाच्या २३ वर्षीय मुलानं एका महिलेसह तिच्या मुलीवर लागोपाठ तीन आठवडे बलात्कार करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपीला पोलिसांनी पीडित महिलेच्या घरातूनच अटक केली.

Maharashtra Times 10 Jun 2017, 2:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त | गुरुग्राम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cops son rapes woman and daughter for three weeks
पोलिसाच्या मुलाचा मायलेकींवर ३ आठवडे बलात्कार

तान्ह्या बाळाला चालत्या रिक्षातून फेकून तिच्या आईवर अत्याचार केल्याचं प्रकरण ताजं असतानाच गुरुग्राममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पोलिसाच्या २३ वर्षीय मुलानं एका महिलेसह तिच्या मुलीवर लागोपाठ तीन आठवडे बलात्कार करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपीला पोलिसांनी पीडित महिलेच्या घरातूनच अटक केली.

आशिष कुमार असं या नराधमाचं नाव असून त्याचे वडील दिल्ली पोलिसांत उपनिरीक्षक आहेत. तो दिल्लीच्या आर्मी कॉलनीत राहतो. गुरुग्राममधील राजेंद्र पार्क येथील बाजारात २५ दिवसांपूर्वी त्याची पीडित महिलेशी अचानक ओळख झाली. त्यानंतर त्यानं पीडित महिलेचा पाठलाग करून त्यांचं घर गाठलं. त्यानंतर तो वारंवार त्यांच्या घरी जाऊन धमकी देत महिला आणि तिच्या मुलीवर अत्याचार करत होता. गेल्या तीन आठवड्यांपासून आशिष त्रास देत असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. अखेर आपल्या मुलीला होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली आणि प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांना सापळा रचून आशिष कुमार याला पीडित महिलेच्या घरातच अटक केली.

आशिष कुमार याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना १० व्हिडिओ क्लिप मिळाल्या असून याच व्हिडिओवरून तो महिला व तिच्या मुलीला ब्लॅकमेल करत असल्याचं उघड झालं आहे.

मूळची उत्तराखंडची रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरीला असून तिची मुलगी इयत्ता १०वीची विद्यार्थी आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून आशिष कुमार याच्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज