अ‍ॅपशहर

करोनाबाबत आणखी एक गुड न्यूज; १०१ दिवसांत सर्वात कमी रुग्ण

India Corona Updates: सोमवारी भारतात करोनाचे ३६,६०४ रुग्ण आढळले. ही संख्या गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी संख्या आहे. या पूर्वी १७ जुलैला ३५,०६५ नवे रुग्ण आढळले होते. आता १०१ दिवसांनंतर करोनाचा आलेख बऱ्याच प्रमाणावर खाली गेला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2020, 8:47 am
नवी दिल्ली:देशात करोनाविरोधातील लढाईदरम्यान आता आशेचा किरण दिसू लागला आहे. करोनाच्या नव्या रुग्णवाढीत आता घसरण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी भारतात करोनाचे ३६ हजार ६०४ नवे रुग्ण आढळले असून हा आकडा गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे. या पूर्वी १७ जुलैला ३५ हजार ०६५ नवे रुग्ण आढळले होते. आता १०१ दिवसांमध्ये करोनाचा आलेख मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम करोना: १०१ दिवसांत सर्वात कमी रुग्ण


देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाच्या वाढीवर नियंत्रण मिळाले आहे. या राज्यांमध्ये करोनाच्या नव्या रुग्णवाढीत घसरण झाल्याचे दिसत आहे. याचे परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसले आहे. तेव्हा एका दिवसात ९० हजार ते ९७ हजार नवे रुग्ण आढळत होते.

करोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू

सोमवारी करोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबरच करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढून ती १ लाख १९ हजार ४९६ इतकी झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ६५२ इतकी आहे. यात ६ लाख ३० हजार ५४६ सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत १६ टक्के रुग्ण कमी

कोविड-१९ च्या नव्या रुग्णांमध्ये या आठवड्यात (१९-२५ ऑक्टोबर) सर्वात मोठी घट दिसून आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १६ टक्के कमी नवे रुग्ण आढळले. तर, मृत्यूचचा संख्या देखील या कालावधीत १९ टक्क्यांनी कमी राहिलेली आहे. या आठवड्यात ३.६ लाखांहून काहीसे अधिक रुग्ण आढळले आहेत. ही संक्या गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी संख्या आहे.

क्लिक करा आणि वाचा- मास्क घालणं बंधनकारक करणार, 'हे' राज्य सरकार करणार कायदा

गेल्या ६ आठवड्यांपासून येतेय गुडन्यूज

या पूर्वी २०-२६ जुलैच्या दरम्यान, करोनाचे ३.२ लाख रुग्ण होते. गेल्या आठवड्यात देशात सुमारे ४.३ लाख रुग्णांची नोंद झाली. देशात कोविडने शिखर गाठल्यानंतर (७-१३ सप्टेंबर) रुग्ण संख्या कमी होत जाण्याचा हा सततचा सहावा आठवडा आहे. या बरोबर भारतात करोना ही महासाथ आता आटोक्यात येऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: जातीय सलोखा राखत 'त्यांनी' घडवले मानवतेचे दर्शन
क्लिक करा आणि वाचा- करोना: तीन महिन्यांनंतर २४ तासांत वाढले सर्वात कमी रुग्ण; मृतांची संख्याही ५०० हून कमी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज