अ‍ॅपशहर

coronavirus india : केंद्राचा निर्णय; आरोग्य कर्मचाऱ्यांचे ५० लाखांचे विमा कवच काढले?

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू आहे. आशातच केंद्राच्या एका निर्णयामुळे करोनाविरोधी लढाईत आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेले विमा कवच काढले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2021, 5:45 pm
नवी दिल्लीः करोना व्हायरसविरूद्धच्या ( coronavirus india ) लढाईत पहिल्या फळीचे करोना योद्धे ( corona warriors ) असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक झटका देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी ५० लाखांचे विमा कवच दिले होते. आता हे विमा कवच यापुढे कायम न ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. The New Indian Express ने हे वृत्त दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus india
केंद्राचा निर्णय; आरोग्य कर्मचाऱ्यांचे ५० लाखांचे विमा कवच हटवले


करोनाविरोधी लढाईत आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला ५० लाखांचे विमा कवच मिळत होते, अशी ही योजना होता. ही योजना मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याचा या मागचा हेतू होता. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाची देखभाल होईल, असा या मागचा सरकारचा प्रयत्न होता.

देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून रोज दीड लाखाहून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचा निर्णय आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र फटका बसणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात राज्यांना यासंदर्भात सर्क्युलर पाठवले आहे. ही योजना २४ मार्चला संपेल, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. या योजनेनुसार आतापर्यंत २८७ प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. या योजनेनुसार देशातील २२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले होते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. सरकारची विमा कंपनी सोबत चर्चा सुरू असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

कुणासाठी होती ही योजना?

आरोग्य सुविधा केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकी सहायक, सफाई कर्मचारी आणि इतरांना हे विमा कवच देण्यात आले होते. सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉइज, नर्स, आशा वर्कर, सहायक कर्मचारी, डॉक्टर्स आणि शल्यचिकित्सक आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना हे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गेल्या वर्षी केली होती. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही यात सहभागी करून घेण्यात आलं होतं.


vaccination : करोना; १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशात करोनाने किती आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाने मृत्यू झाला याचा आकडा उपलब्ध नाहीए. पण देशात करोनाने आतापर्यंत ७३९ एमबीबीएस डॉक्टरांचा मृत्यू झाला, असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे.

coronavirus india : राज्यांना थेट उत्पादकांकडून करोनावरील लस खरेदी करता येणारः केंद्र सरकार

ही योजना अतिशय उपयोगी ठरली. या योजनेमुळे करोनाने मृत्यू झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. ही योजना २४ मार्चपर्यंतच होती. २४ मार्चपर्यंतच्या मध्यरात्रीपर्यंत या योजनेअंतर्गत क्लेम स्वीकारले जातील. सर्व क्लेम्स सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २४ मार्चला राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज