अ‍ॅपशहर

mucormycosis : 'हा निर्णय क्रूर; पण वृद्धांऐवजी तरुणांचा जीव वाचवा, ते देशाचे भवितव्य आहेत'

करोना संसर्ग आणि औषधांच्या तुटवड्यावरून मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीच्या रुग्णांसाठी उपयोगी असलेल्या औषधांच्या तुटवड्यावरून दिल्ली हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2021, 10:04 pm
नवी दिल्लीः करोना संसर्ग आणि औषध व्यवस्थापन प्रकरणी केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्ली हायकोर्टात ( delhi high court ) सुनावणी झाली. म्यूकरमायकोसिस ( mucormycosis ) म्हणजे काळ्या बुरशीच्या रुग्णांवरील उपचारात आवश्यक असलेल्या लिपोसोमल एम्पोटेरिसिन-बी औषधाच्या वितरणावर ( mucormycosis drug shortage ) धोरण आखण्याचे आणि रुग्णांचा प्राध्यान्यक्रम ठरवण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi high court
'वृद्धांऐवजी तरुणांचा जीव वाचवा, ते देशाचे भवितव्य आहेत; पण हा निर्यण क्रूर'


म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीच्या आजारावर प्रभावी असलेले एम्फोटेरिसिन-बी या औषधाचा सध्या तुटवडा आहे. अशा परिस्थितीत आपल्याला वृद्धांऐवजी तरुणांचे जीव वाचवण्यावर लक्ष दिले पाहिजे, असं हायकोर्टाने नमूद केलं.

एकाच कुटुंबातील २ रुग्ण आहेत. एका रुग्णाचं वय ८० आणि दुसऱ्याचं ३५ वर्षे आहे. आणि औषधाचा फक्त एकच डोस आहे, अशावेळी आपण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करणार? हे निश्चित करणं अवघड आहे. पण अशा स्थितीत आपल्याला तरुणांचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती विपीन सांघी आणि न्यायमूर्ती जसमित सिंग यांच्या पीठाने नमूद केलं. हा अतिशय क्रूर निर्णय आहे. पण तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. यामुळे सर्वप्रथम त्यांचा जीव वाचवायला हवा, असं हायकोर्टाने म्हटंल.

coronavirus : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, देशात होणार चौथा सीरो सर्वे

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्स (ICMR) म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीवरील उपचारात उपयोगी असलेल्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन-बी, प्लेन एम्फोटेरिसिन-बी आणि पॉसकोनाजोलच्या वापरासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, असे निर्देश कोर्टाने दिले.

covid vaccine : जुलैपासून रोज १ कोटी नागरिकांना डोस, डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण लोकसंख्येचे लसीकरणः ICMR

८० वर्षांच्या वृद्धाने आपलं आयुष्य जगलंय

८० वर्षांच्या वृद्धाने आपलं आयुष्य जगलं आहे. ते देशाला पुढे घेऊन जाणार नाहीत. यामुळे आपल्याला कठीण प्रसंगी तरुणांची निवड करावी लागेल. कुणाचं आयुष्य अधिक महत्त्वाचं आहे आणि कुणाचं कमी, असं आम्हाला म्हणायचं नाही. प्रत्येकाचं जीवन महत्त्वाचा आहे. पण आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, असं हायकोर्टाने म्हटलं.

coronavirus india : करोनाची तिसरी लाट आणि मुलांना संसर्ग; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

कुणाच्या वाचण्याची शक्यता अधिक आहे, हेही आपल्याला बघावं लागेल. त्यानुसारच औषधांचं वितरण करावं लागेल. पण औषधांचा तुटवडा असताना कुणाला वाचवायचं आणि कुणाला मरण्यासाठी सोडायचं हे, ठरवणं अवघड असल्याचं हायकोर्ट म्हणालं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज