अ‍ॅपशहर

coronavirus : करोनाचे टेन्शन! सलग तिसऱ्या दिवशी ३ लाखांवर रुग्ण, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या १० हजारांवर

देशात करोनाची तिसरी लाट सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात करोनाचे ३ लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २१ लाखांवर गेली. दुसरीकडे, हजारो नागरिक करोनामुक्तही होत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2022, 11:03 am
नवी दिल्ली : देशातील करोनाच्या स्थितीची केंद्र सरकारने माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही ३ लाखांवर आढळून आली आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ३ लाख ३७ हजार ७०४ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या शुक्रवारच्या तुलनेत ९,५५९ ने कमी आहे. तर करोनाच्या ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ४२ हजार ६७६ जण करोनातून बरे झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india reports 337704 new covid cases 488 deaths
करोनाचे टेन्शन! सलग तिसऱ्या दिवशी ३ लाखांवर रुग्ण, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या १० हजारांवर


देशात गेल्या तीन दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ३ लाखांवर आढळून येत आहे. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. देशात करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २१ लाख १३ हजार ३६५ वर गेली आहे. तसंच देशातील करोनाचा पॉझिटिव्हीटी दर वाढून १७.२२ टक्क्यांवर गेला आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० हजारांवर

देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या १० हजारांवर गेली आहे. देशात ओमिक्रॉनच्या आतापर्यंत एकूण १०,०५० रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या २४ तासांत ओमिक्रॉनच्या ३.६९ टक्के रुग्णांची वाढ झाली आहे.

करोनातून बरे झाल्यावर लस कधी द्यायची? केंद्राची मार्गदर्शक सूचना जारी

Cowin Portal Data Leak: हजारो भारतीयांचा कोविनवरील डेटा लीक?; केंद्राने दिले 'हे' स्पष्टीकरण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज