अ‍ॅपशहर

गुड न्यूज! २५ जिल्ह्यांत करोनाचा नवीन रुग्ण नाही

आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण आढळलेले नाहीत. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2020, 5:33 pm
नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची संख्या ९१५२. गेल्या २४ तासांत ७९६ नवे रुग्ण आढळले. तर ३५ जणांचा मृत्यू झालाय. मृतांची देशातील एकूण संख्या ३०८ इतकी झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलीय. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Health-Ministry


करोनाच्या २ लाखाहून अधिक चाचण्या

देशातील प्रयोगशाळांमध्ये २ लाख ६ हजा २१२ चाचण्या आतापर्यंत केल्या गेल्या आहेत. आपल्याकडे मोठा असल्याने पुढचे सहा आठवडे आपण सहज अनेक चाचण्या सरू शकतो, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. करोना टेस्ट किटची पहिली खेप १५ तारखेला भारतात दाखल होणं अपेक्षित आहे, असं गंगाखेडकर यांनी सांगितलं.

लॉकडाऊनच्या काळात आत्यवश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राज्यांकडून करण्यात येत आहे. लष्कराचे निवृत्त जवान, एनएसएस आणि एनसीसी कॅडेट्सह इतर विभागाद्वारे पोलिसांना सहकार्य लॉकडाऊनमध्ये केलं जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पी.एस. श्रीवास्तव यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज