अ‍ॅपशहर

करोनाची ५१४ जवानांना बाधा, ५ मृत्यू

जम्मू-काश्मीर, भारत-पाक सीमा, नक्षलग्रस्त भाग, भारत-बांगलादेश सीमा अशा ठिकाणी या निम लष्करी दलांचे जवान तैनात असतात. पण करोनाची लागण झालेल्या जवानांपैकी ९५ टक्के जवान हे दिल्लीत कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात होते. निमलष्करी दलातील ५०० हून अधिक जवानांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातील ५ जवानांचा करोनाने बळी घेतला आहे. यापैकी दिल्लीतील ४५० जवानांना करोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2020, 9:08 pm
नवी दिल्लीः करोना प्रादुर्भाव निम लष्करी दलांमध्ये झाला आहे. आतापार्यंत ५१४ जवानांना करोनाची बाधा झाली असून यापैकी ५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. तर ५१४ पैकी ९५ टक्के रुग्ण जवान हे एकट्या दिल्लीतील आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crpf-jawan


केंद्रीय राखीव सुरक्षा दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), इंडो तिबेट सीमा पोलीस (ITBP), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (CISF) आणि सशस्त्र सीमा दलालात (SSB) करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या निमलष्करी दलातील ५०० हून अधिक जवानांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातील ५ जवानांचा करोनाने बळी घेतला आहे. यापैकी दिल्लीतील ४५० जवानांना करोनाची लागण झाली आहे.

जम्मू-काश्मीर, भारत-पाक सीमा, नक्षलग्रस्त भाग, भारत-बांगलादेश सीमा अशा ठिकाणी या निम लष्करी दलांचे जवान तैनात असतात. पण करोनाची लागण झालेल्या जवानांपैकी ९५ टक्के जवान हे दिल्लीत कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात होते.

औरंगाबाद रेल्वे अपघात प्रकरणी मानवाधिकार आयोगाची नोटीस

स्थलांतरीत मजुरांना सरकारने मरण्यासाठी सोडलंयः यशवंत सिन्हा

सीमा सुरक्षा दलातील (BSF) करोना बाधित जवानांची संख्या ही २०० च्या जवळपास आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढलीय. केंद्रीय राखीव सुरक्षा दल (CRPF)च्या जवानांची संख्या १६२ इतकी झाली आहे. यापैकी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. निम लष्करी दलातील जवानांना प्रामुख्याने जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागात तैनात केलं जातं. पण कायदा- सुरक्षेसाठी या दलातील जवानांना दिल्लीत तैनात करण्यात आलंय. त्यातील १५६ जवानांना करोनाची लागण झाली आहे. तर आयटीबीपीतील ८५ जवानांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज