अ‍ॅपशहर

coronavirus : करोनाचे संकट कायम; देशात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले, केंद्र सरकार म्हणाले...

करोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. आता करोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचा धोका वाढला आहे. देशात करोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2021, 7:19 pm
नवी दल्लीः करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून देश पूर्णपणे बाहेर ( coronavirus india ) पडत नाही तोच तिसऱ्या लाटेचे काळे ढग घोंघावत आहेत. देशात करोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटच्या ( delta plus variant ) रुग्णांची संख्याही वाढून ५० वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. देशातील ८ राज्यांमध्ये डेल्टा वेरियंटचे ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे, असं राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid-19 india
करोनाचे संकट कायम; डेल्टा प्लसचे रुग्ण वाढल्यामुळे केंद्र सरकार म्हणाले...


देशात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५३१ जिल्ह्यांमध्ये रोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यांची संख्या कमी होऊन ती २६२ जिल्ह्यांपर्यंत खाली आली आहे. सध्या देशात १२५ जिल्ह्यांत १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ५१, ६६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या एक आठवड्यात करोना रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ६, १२, ००० पर्यंत खाली आली आहे.

Covovax: 'कोव्हिशिल्ड'नंतर सीरमकडून आणखी एका लशीच्या निर्मितीला सुरूवात

Vaccination : लसीकरण फास्ट ट्रॅकवर! देशात सलग दुसऱ्या दिवशी दिले ६० लाखांहून अधिक डोस

देशाचा करोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढला आहे. देशात आतापर्यंत ३१,१३,१८,३५५ जणांना करोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. गेल्या काही तासांत ३४ लाखा अधिक नागरिकांना करोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. तर ४७ लाखांहून अधिक डोस पापइ लाइनमध्ये आहेत. संपूर्ण देशात करोनावरील लसीकरणाचा विस्तार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज