अ‍ॅपशहर

देशातील करोना रुग्णांची संख्या ८,४४७ वर

गेल्या २४ तासांत करोनाचे ९१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या ही ८,४४७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने देशातील मृतांची एकूण संख्या २७३ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तर करोनावर लस बनवण्याचे काम सुरू आहे. लसच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. अद्याप लस तयार झालेली नाही, असं आयसीएमआरने स्पष्ट केलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2020, 6:11 pm
नवी दिल्लीः देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ८ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ९१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या ही ८,४४७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने देशातील मृतांची एकूण संख्या २७३ इतकी झाली आहे तर ७६४ जण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Health-Ministry


करोना चाचण्यांचा वेग तातडीने वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही करोनाच्या चाचण्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त करोना रुग्णांसाठी ६०१ हॉस्पिटल्स देशात बनवण्यात येत आहे. या हॉस्पिटल्समधील बेडची संख्याही १ लाख ५ हजार इतकी आहे. जिथे रुग्ण आढळून आले आहेत ते भाग सील करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तर आपण करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

जीव वाचवण्याची संधी भारत दवडणार नाही: मोदी

करोना: ड्यूटीवरून गायब झाले २३४ डॉक्टर्स

लस बनवण्याचे काम सुरूः IMCR

करोनावर लस बनवण्याचे काम सुरू आहे. लसच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. पण अद्याप लस पूर्णपणे तयार झालेली नाही. ४० विविध प्रकारच्या लसींवर काम सध्या सुरू आहे. विविध स्तरांवर त्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. पण पुढच्या टप्प्यात एकही लस गेलेली नाही. यामुळे करोनावर अद्याप लस तयार झाली नसल्याचं आयसीएमआरचे डॉ. मनोज मुर्हेकर यांनी दिली.

१३ देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन पुरवणार

देशात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा मुबलक साठा आहे. देशाची गरज लक्षात ठेवून १३ देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज